आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Increase Energy | शारीरिक आणि मानसिक काम (physical And Mental Work) केल्यानंतर थकवा (Tired) जाणवणे सामान्य आहे. अनेकदा जेव्हा जेव्हा थकवा जाणवतो, एक कप चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर आपल्याला थोडा वेळ ऊर्जा मिळते. थकवा (Fatigue) दूर करण्यासाठी आपण अनेकदा एनर्जी ड्रिंक्स आणि स्नॅक्स घेतो. डॉक्टर आणि पोषणतज्ञांचा असा विश्वास आहे की थकवा दूर करण्यासाठी वापरण्यात येणारे हे पदार्थ आपल्याला फक्त काही मिनिटांसाठी ऊर्जा देतात, परंतु ते सेवन केल्यानंतर लगेचच उर्जेची पातळी कमी होते आणि आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त थकवा जाणवतो. (Increase Energy)
काम करताना थकवा जाणवणे स्वाभाविक आहे, पण सतत थकवा जाणवणे हे समस्येचे कारण ठरू शकते. अॅलर्जी, अॅनिमिया, डिप्रेशन, व्हायरल इन्फेक्शन, थायरॉईड, हृदयविकार, अर्थरायटिस, स्लीप डिसऑर्डर आणि कॅन्सर (Allergies, Anemia, Depression, Viral Infections, Thyroid, Heart Disease, Arthritis, Sleep Disorders And Cancer) ही वारंवार थकवा जाणवण्याची कारणे असू शकतात.
तुम्हालाही वारंवार थकवा जाणवत असेल तर त्याचे कारण शोधा आणि अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करा जे थकवा दूर करण्यात प्रभावी ठरतात. (Increase Energy)
शरीराचा थकवा दूर करून ऊर्जा देणारे 5 पदार्थ जाणून घेवूयात (5 Energy Giving Foods By Relieving Body Fatigue)…
1. फळे आणि भाज्यांचे सेवन करा (Eat Fruits And Vegetables) :
ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते, तसेच शरीराला ऊर्जा मिळते. फळे आणि भाज्या मेटाबॉलिज्म योग्य ठेवतात तसेच एनर्जी लेव्हल वाढवतात. फळे आणि भाज्या हे असे पदार्थ आहेत जे थकवा आणि नैराश्य टाळतात.
2. या पेयांचे करा सेवन (Consume These Drinks) :
एनर्जी सुधारण्यासाठी दर तासाला चहा पिणे योग्य नाही. कॅफिनच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर परिणाम होतो. ऊर्जा कमी असल्यास चहाऐवजी ताज्या फळांचा ज्यूस, मिल्कशेक, ग्रीन टी किंवा स्मूदीचे सेवन करा. ही पेये चहाला पोषक पर्याय आहेत, ज्यामुळे थकवा दूर होतो.
3. सफरचंद सेवन (Eat Apple) :
वारंवार थकवा जाणवत असेल तर सफरचंद खा. सफरचंदामध्ये असलेले फ्रक्टोज हे एक नैसर्गिक गोडवा आहे जे शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करते.
4. डार्क चॉकलेटचे सेवन करा (Eat Dark Chocolate) :
थकवा आलेला असताना चॉकलेट खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. हे कोकोआ आधारित अन्न थिओब्रोमाइनने समृद्ध आहे.
चॉकलेट खाल्ल्यानंतर तुमचा मेंदू सक्रिय होतो आणि थकवा दूर होतो.
5) बदामाचं सेवन करा (Eat Almonds) :
ज्यांना नेहमी काम करताना थकवा जाणवत असेल तर त्यांनी सदैव बदाम जवळ ठेवावे. बदाम थकवा दूर करते तसेच त्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. बदामामध्ये विटामीन बी असतं जे ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतं. बदामामध्ये असलेलं मॅगनेशीयम मांसपेशींमधील थकवा दूर करण्यास परिणामकारक असतं. मुठभर बदाम तुमचा थकवा दूर करण्यास पुष्कळ होतील.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Increase Energy | amazing five foods that can fight to fatigue