आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सूज तुमच्या आरोग्यासाठी चांगली आणि वाईट दोन्ही असू शकते. ही कधी संसर्गाशी लढण्यासाठी मदत करते, तर कधी-कधी वजन वाढणे आणि ऑटोइम्यून आजाराला जन्म देते. सूज ही पेशी आणि ऊतींना ठिक करण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. यासाठी शरीरात सूजेचे नियंत्रण महत्वाचे आहे. याकरता डाएटमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. अँटी-इम्फ्लेमेटरी फूड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि सहायक फॅट्स असतात. जाणून घेवूयात.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
बेरीज
सर्व प्रकारच्या बेरीजमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी गुण आढळतात. यात अँटी-ऑक्सीडेंट्स सुद्धा आढळतात. जे जुन्या रोगात औषधाप्रमाणे काम करतात. दोन वेगळ्या शोधांद्वारे खुलासा झाला आहे की, बेरीजच्या सेवनाने एनके सेल्स उत्सर्जित होतात. यामध्ये अॅटीऑक्सीडेंट आढळते, ज्यास पॉलीफेनोल म्हटले जाते. पॉलीफेनोल लिव्हरचे संरक्षण करते. बेरीज इम्यून सिस्टम सुद्धा मजबूत करण्यास मदत करते.
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
फॅटी फिश
फॅटी फिशमध्ये उच्च मात्रेत ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. यामध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी, अँटी-ऑक्सीडेटिव्ह, अँटी-कार्सिनोजेनिक गुण आढळतात. हे मेंदूला सुद्धा अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवते. यासाठी सॉलमन, टूना, हेररिंग्ज माशांचे सेवन करू शकता. आठवड्यात दोन वेळा फॅटी फिशचे सेवन आवश्य करा.
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
ब्रोकली
ब्रोकलीमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. ब्रोकली अस्ट्रोजन हार्मोनला नियंत्रित ठेवते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन-के आणि फायबर आढळते. याशिवाय, यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स गुण आढळतात. जे शरीरात अँटी-इम्फ्लेमेटरीप्रमाणे काम करते. यामध्ये कॅल्शियम सुद्धा आढळते जे महिलांमध्ये होणार्या प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम समस्या दूर करण्यात मदत करते. सोबतच तणाव, चिडचिडेपणा, वारंवार खाणे आणि थकव्याची समस्या दूर करते.
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
ग्रीन टी
यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल, फायबर, कॅफीन, अँटी-ऑक्सीडेंट आणि अमिनो अॅसिड आढळते, जे अनेक आजारांवर लाभदायक आहे. तज्ज्ञ सुद्धा ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. हे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी लाभदायक आहे. विशेषता वाढणारे वजन कमी करणे, केसांची समस्या दूर करणे आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी हे वरदान आहे.
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
चेहर्यावर Wax केल्यानंतर चूकुन देखील ‘हे’ काम करू नका, स्किन होईल खराब; जाणून घ्या
Hair Care Tips : रूटीनमध्ये ‘हे’ 8 बदल करा, आपोआप लांब होतील केस; जाणून घ्या
Skin Care : मासिक पाळी दरम्यान चेहर्यावर फोडं आले तर ‘ही’ गोष्ट करा, जाणून घ्या