पुण्यात इनामदार हॉस्पिटल तर्फे वारकऱ्यांसाठी विनामूल्य आरोग्य शिबीर

health-camp

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे वारकऱ्यांसाठी विनामूल्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जून रोजी दिवसभर हे शिबीर अहुरा हाईट, शीतळादेवी चौक (गुरुवार पेठ) येथे होणार आहे.

इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.परवेझ इनामदार यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे. २० डॉक्टर्स आणि परिचारिका या शिबिरात सहभागी होणार आहेत. नवयुग मंडळाच्या सहकार्याने हे शिबीर होत आहे.