आरोग्यनामा ऑनलाइन – थंडीच्या दिवसात उन्हात शरीराला शेक घेणे गुप आवश्यक असते. कारण या काळात उन खुप कमी आणि सौम्य असते, यामुळे याचे महत्व वाढते. डॉक्टर सांगतात की, शरीर निरोगी राहण्यासाठी हाडे मजबूत राहणे गरजेचे आहे. शहरात राहणार्या लोकांमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता ही सर्वसामान्य बाब झाली आहे. अशावेळी थंडीच्या दिवसात याबाबत काळजी घेणे खुप आवश्यक असते.
थंडीतील उन
थंडीतील उन्हात शेक घेण्याबाबत अनेक संशोधने करण्यात आली आहेत. यात म्हटले आहे की, हे उन शरीरासाठी खुप लाभदायक असते. परंतु, उन्हात उभे राहिल्यावर व्हिटॅमिन डी शरीराच्या उघड्या भागालाच मिळते. हा भाग केवळ 20 टक्के एवढाच असतो.
रोज 15 मिनिट उन अंगावर घेतल्याने व्हिटॅमिन डीची चांगली मात्रा शरीराला मिळू शकते. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच्या उन्हातून मानवी शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.
महिलांसाठी हे उन खुप जरूरी असते. कारण 40 वयानंतर त्यांना ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोमलेशिया होण्याची शक्यता असते. मुलांमध्येही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रॅकेट्सची समस्या होते. यासाठी मुलांना सुरूवातीपासून योग्य आहार आणि उन दिले पाहिजे.