आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तापमानाच्या चढ-उतारामुळे वातावरणामध्ये बदल होतो. मोठया माणसांपेक्षा लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते. प्रामुख्याने उन्हाळयात सूर्याची किरणं, गरम हवा आणि वाढणारे प्रदुषय यामुळे लहान मुलं आजारी पडण्याची दाट शक्यता असते. मुलं आजारी पडू नये म्हणून पालकांनी काही खास गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. उन्हाळयातील समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही महत्वाची कामं करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया ती महत्वाची कामं काय आहेत ते.
1. मुलांना ज्यूस, लिंबू पाणी पिण्यास सांगावे
मुलं भरपुर पाणी पिण्यासाठी नकार देत असतील तर त्यांना इतर पेय पदार्थ पिण्यासाठी आवर्जून द्यावेत. मुलांना आपण लिंबू पाणी, फ्लेवर्ड सरबत, फळांचे ज्यूस यासारखे पदार्थ पिण्यासाठी देऊ शकतो. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या वेळा फिक्स करा आणि त्यांना पेय पदार्थ पिण्यासाठी वेळोवेळी द्या.
2. मुलांना जास्तीत जास्त पाणी पिण्यास द्या
मुलांना वेळेवर आहार घेण्यासाठी आग्रह केल्यानंतर बहुसंख्य मुले आता नको, नंतर घेतो असे म्हणून जेवण, नाष्टा टाळतात तसेच ते पाण्यापासूनही दूर रहातात. या सर्व गोष्टी त्यांच्या मनावर अवलंबून असतात. मात्र, उन्हाळयात मुलांना गरम हवा, सन स्ट्रोक आदींपासून वाचवायचे असेल तर त्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी द्या, कारण त्यामुळे त्यांचे शरीर आतमधुन हायड्रेट राहण्यास चांगलीच मदत होईल.
3. सनस्क्रिन
आपण मुलांना कितीही थांबवलं तरी देखील मुलं खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. उन्हाळयात मुलं घराबाहेर पडण्यापुर्वी त्यांच्या त्वचेवर सनस्क्रिन आवश्यक लावावे.
4. आवश्य कॉटनचे कपडे परिधान करावेत
उन्हाळयाच्या दिवसांमध्ये मुलांना अधिकाधिक कॉटनचे कपडे घालायला सांगावे. कारण, कॉटनचे कपडे घाम शोषून घेतात. गरम हवा आणि सुर्याची किरणं थेट मुलांच्या अंगावर पडणार नाहीत. कॉटनचे हलक्या रंगाचे कपडे परिधान केल्यास सूर्याच्या किरणांपासुन बचाव होतो.
5. डासांपासून रक्षण करणे गरजेचे
उन्हाळयाच्या दिवसांमध्ये बर्यापैकी डासांचे प्रमाण वाढते. डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे गंभीर आजार होवुन मुले आजारी पडू शकतात. त्यामुळे डासांपासून बचाव करण्यासाठी क्रिम किंवा लोशनचा वापर करावा.
महत्वाचे – वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. कोणताही उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.