आरोग्यसेवेत केरळ नंबर १ वर, महाराष्ट्राचे स्थान कितवे ?
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य निर्देशांकात केरळ नंबर एक चे राज्य ठरले आहे. या रँकिंगमध्ये केरळनंतर आंध्र प्रदेशचे दुसर तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. आंध्र प्रदेशसारख्या राज्यानेही महाराष्ट्राच्या पुढचा नंबर पटकावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या वेळीही आरोग्य सेवेत केरळच सर्वोत्तम होते. नीती आयोगाने हे हेल्थ इंडेक्स रँकिंग जाहिर केले आहे. २०१५-१६ आणि २०१७-१८ च्या मध्ये २३ आरोग्य निर्देशांकांच्या आधारे आणि राज्यांची आरोग्य सेवा तपासून हे क्रमांक दिले आहेत. या इंडेक्समध्ये आरोग्यसेवा कुठे महाग आहे, हेही दर्शवले आहे.
कुठल्या राज्यांमध्ये रुग्णाच्या खिशातून जास्त पैसे जातात, ते दर्शविण्यात आले आहे. सर्वात जास्त खर्च मणिपूरमध्ये येतो. तो जवळजवळ १० हजारापेक्षा जास्त येतो. सर्वात कमी खर्च दादरा, नगर हवेली येथे येतो. तो सुमारे ४७१ रुपये आहे. दिल्लीत हा खर्च जास्त असून एका व्यक्तीला ८ हजारापेक्षा जास्त आहे.नीती आयोगाने घोषित केलेल्या हेल्थ इंडेक्स रँकिंगनुसार आरोग्य सेवेत टॉप ३ मध्ये अनुक्रमे केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. तर सुधारणा करणारे टॉप ३ राज्यात अनुक्रमे हरियाणा, राजस्थान आणि झारखंड आहे.
तर आरोग्यसेवेत कमकुवत असणाऱ्या राज्यात अनुक्रमे ओडिशा, बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्य आहेत. नीती आयोगाने आरोग्य मंत्रालयासोबत २३ वेगवेगळ्या परिमाणांवर राज्यांची माहिती घेतली. त्या आधारे हा राज्याचे हेल्थ रँकिंग घोषित करण्यात आले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी हेल्थ रँकिंग जाहिर करताना म्हटले की छोट्या राज्यांमध्ये सुधारणा होत आहे. मोठ्या राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान आणि झारखंडने गेल्या वेळेपेक्षा आताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केल्याचे दिसून येत आहे.. छोट्या राज्यांमध्ये मिझोराम पुढे असून त्रिपुरा आणि मणिपूर यांनीही रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे.