आरोग्यानामा ऑनलाइन टीम : आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अनेकजण सतत डाएट फूडचे सेवन करत असतात. काही लोक सतत कॅलरी मोजून पदार्थ खातात. डाएट फूड खाण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. परंतु, अशा आहाराने शरीराचे योग्य पोेषण होते का, हा महत्वाचा मुद्दा आहे. अनेकदा अशा पदार्थांमुळे आरोग्याचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातात. डाएट फूडच्या नावाखाली कोणते चुकीचे पदार्थ खाल्ले जातात, त्याविषयी जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
शुगर फ्री
शुगर फ्री पदार्थ खाण्याऐवजी योग्य प्रमाणात गूळ टाकलेले पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले आही.
फायबर फूड
शरीराला फायबर मिळावे म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या पावडरी खाण्यापेक्षा फळे, पालेभाज्या खाव्यात.
डाएट चिवडा
काहीजण डाएट चिवडा पोटभर खातात, यामुळे वजन वाढू शकते. याऐवजी राजगीरा वडी, फळे हे उत्तम पर्याय आहे.
व्हिटॅमिनच्या गोळ्या
काही लोक पोषक नाश्ता घेण्याऐवजी व्हिटॅमिनच्या गोळ्या खातात. हे आरोग्यासाठी खुप घातक आहे. रोज ठरल्यावेळी पोटभर नाश्ता करणे खुप गरजेचे आहे.
डाएट सॉफ्ट ड्रिंक्स
डाएट सॉफ्ट ड्रिंक्स प्याल्याने वजन वाढत नाही, असा समज अनेकांचा असतो. परंतु, पचायला जड असल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते.
डाएट बिस्किट्स
डाएट बिस्किट जास्त खाणे शरीरासाठी चांगले नाही. यापेक्षा पोळी-पराठे खावेत.
Visit : arogyanama.com