आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुलांना लहान वयात कांजण्या आणि गोवर या समस्या होतात. यामुळे त्यांना त्रास होतो. गोवर आणि कांजण्यांच्या अंगांवरील चट्टयामध्ये एक फरक असून गोवरामध्ये अंगावर रंगाचा डब्बा ओतल्यावर तो जसा अंगावरून खाली जाईल, तसे अंगावरील पुरळ खाली सरकत जाते आणि कांजण्यांमध्ये सूर्य उगवतो तसे छातीच्या मध्यावरून पुरळ उगवते. कांजण्या हा संसर्गजन्य आजार ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींना जास्त होतो
अशी घ्या काळजी
१ यामुळे जेवण थोडे कमी जात असले तरी पाणी मात्र भरपूर प्यावे.
२ पचनशक्ती मंदावते, भूक कमी होते, म्हणून मुलांना फळे-फळांचा रस द्या.
३ फोड वाढले म्हणून घाबरण्याची गरज नसते. ते कमी आपोआप कमी होतात.
४ खाज येते असल्याने खाज कमी होण्याची औषधे घ्या.
५ मुलांची नखे कापून घ्या. फोडांना खाजवल्यामुळेजंतुसंसर्ग होतो.
६ कांजण्या होण्यापूर्वीच लसीकरण करुन घ्यावे.