आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डबल चिन बद्दल तुम्ही ऐकले असेलच. जर जबड्यांवर किंवा हनुवटी खाली जास्त चरबी असेल तर त्याला डबल चिन म्हणतात. अनेक व्यक्तींना डबल चिन असते. याचे कारण म्हणजे चुकीचा आहार आणि अनुवांशिकता आहे. चरबीप्रमाणेच वाढत्या वयानुसारही डबल चिन दिसून येतं. यामुळे चेहऱ्याला जडपणा जाणवतो. गाल आणि मानेभोवती चरबी येते. ही चरबी कमी करण्यासाठी डिऑक्सिकॉलिक अॅसिडचे(डीसीए) चे इंजक्श देणं ही दीर्घकाळापासून चालत आलेली नान सर्जिकल आणि परिणाम कारक थेरपी आहे.
20 ते 63 वयोगटातील भारतीय रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर असे समोर आले आहे की, मान आणि चेहऱ्यावरील एक तृतीयांश भागावर साचलेली चरबी काढण्यासाठी जेनेरिक डीसीए हे तुलनेने स्वस्त आहे आणि सगळीकडे उपलब्ध आहे.
भारतात 50 वर्ष पर्यंतच्या व्यक्तींमध्ये डबल चिनचा प्रॉब्लेम दिसून येतो. चेहऱ्याचा खालचा भाग आणि मानेभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी अनेकजण नेक लिफ्ट सर्जरी किंवा नेक लायपोसक्शन शस्त्रक्रिया करतात. डीसीए इंजक्शनमध्ये जोखीम कमी असते.
हनुवटीखालील चरबीमुळे व्यक्तिमत्त्व चांगलं दिसत नाही. याचा मानसिकतेवर परिणाम होताना दिसतो. भारतात ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते. संशोधनातून समोर आले आहे की, चेहऱ्याचा खालचा भाग आणि मानेवरील साठलेली चरबी काढण्यासाठी जेनेरिक डीसीए वापरून चांगले परिणाम दिसतात. शिवाय कमी खर्चातच हे उपचार होतात.
डीसीएचे उपचार ओपीडीमध्येही केले जातात. यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसते. जे सर्जन रुग्णांच्या डबल चिनवर जेनेरिक डीसीएने उपचार करतात त्यांच्यासाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक वैधता प्राप्त झाली आहे.