जाणून घ्या – रक्तातील महत्वाचे घटक व त्यांची कार्ये 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रक्त हा लाल रक्त पेशी , पांढऱ्या रक्त पेशी आणि बिंबिका यांनी बनलेला जैविक द्रव पदार्थ आहे.  या पेशींमधील ‘हिमोग्लोबिन’ या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनचे प्रमाण १०० मि.ली. मध्ये सुमारे १५ ग्रॅम इतके असले पाहिजे अन्यथा रक्ताची प्राणवायू नेण्याची क्षमता कमी होते. रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. रक्ताचा उगम अस्थिमज्जेमध्ये होतो. प्रौढांच्या शरीरात एकूण रक्त सुमारे पाच लिटर असते.

रक्ताची कार्ये 

शरीरात आलेल्या रोगजंतूंचा प्रतिकार करणे.

शरीराचे तापमान सर्वत्र समान व कायम राखणे.

रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते.


रोगजंतू पकडणे, नष्ट करणे, रोगजंतूंबद्दल माहिती घेऊन प्रतिकारशक्ती तयार करणे, जखम झाल्यास भरुन काढणे, रक्तस्राव थांबवणे अशी अनेक कामे पांढ-या पेशी करतात.

तांबडया पेशींमध्ये लोहयुक्त हिमोग्लोबिन (रक्तद्रव्य) असते ते प्राणवायू व कार्बवायू वाहून नेण्याचे काम करते.

हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.