लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा हा एक आजाराच असून यामुळे अनेकजण पीडित असतात. लठ्ठपणामुळे विविध आजार सहज जडतात. याचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठ व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी-कमी होत जाते. एकदा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की अनेक रोग शरीरात शिरकाव करतात. यामुळे लठ्ठपणाला प्रथम हद्दपार करणे खुप गरजेचे आहे.

अनियंत्रित स्वरूपात वजन वाढायला लागल्यास त्याचा शरीराच्या प्रतिकार प्रणालीवर प्रभाव पडतो. वजन वाढल्याने हार्मोन्समध्ये बिघाड होतो आणि बाहेरून होणाऱ्या संसर्गाचा सामना करण्याची शरीराची क्षमता कमी होते. अशा वेळी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक असते. संसर्गजन्य ताप किंवा वारंवार सर्दी-पडसे झाल्याने प्रतिकार प्रणाली म्हणजेच इम्युन सिस्टिम कमी कार्यक्षम आहे असे येत नाही. प्रतिकारशक्ती कमी होण्यास इतरही अनेक कारणे आहेत.

ती कमी होऊ नये म्हणून विशेष काहजी घेतली पाहिजे. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीराला भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. लघवी पिवळ्या रंगाची होत असल्यास, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे समजावे. चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळेसुद्धा शरीरात डिहाड्रेशन वाढते. याचा इम्युन सिस्टिमवर वाईट परिणाम होत असतो.