आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Immunity Boost | पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. आर्द्रता आणि अस्वच्छतेमुळे इम्युनिटी कमी होते. याकाळात इम्युनिटी बूस्ट (Immunity Boost) करण्यासाठी तुळस आणि काळीमिरीचा काढा उपयोगी आहे. हा काढा तयार करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1. संसर्ग दूर राहतो.
2. जखम आणि सूजेची समस्या दूर होते.
3. इम्युनिटी वाढते.
4. तणाव दूर करतो, उर्जा वाढवतो.
5. खोकला, सर्दी आणि घशाची खवखव दूर होते.
6. बलगम आणि श्वसनाच्या समस्या दूर राहतात.
7. ब्रोंकायटिस आणि अस्थमात दिलासा मिळतो.
8. पचनशक्ती वाढते.
9. डायबिटीजमध्ये लाभदायक आहे.
10. थकवा दूर होतो.
तुळस आणि काळीमिरीचा काढा असा तयार करा
– साहित्य –
आले, लवंग 4-5, काळीमिरी 1 छोटा चमचा वाटलेली, तुळशीची ताजी पाने 5-6, मध एक छोटा चमचा, दालचिनी काडी
– कृती –
1 – एक खोलगट भांड्यात पाणी उकळवत ठेवा.
2 – पाणी उकळल्यावर आले, लवंग, काळीमिरी आणि दालचिनी क्रश करा.
3 – नंतर सॉस पॅनमध्ये तुळशीच्या पानांसह सर्व वाटलेले साहित्य टाका.
4 – मध्य आचेवर जवळपास 20 मिनिटे मिश्रण निम्मे होईपर्यंत शिजवा.
5 – या मिश्रणात मध मिसळा आणि कोमट असतानाच सेवन करा.
Web Title :- immunity boost basil and black pepper decoction
Stress in Children | तणावामुळे मुलांमध्ये दिसू लागतात भितीदायक लक्षणे, जाणून घ्या तणावाचे संकेत
Weight Loss Tips | ‘या’ सवयी बदला, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल; जाणून घ्या
Desi Ghee | जाणून घ्या देसी तूप कोलेस्ट्रॉलसाठी चांगले आहे की वाईट?