पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील डॉक्टर विविध भागात, सरकारी विभागात आणि कॉलेजमध्ये जाऊन सीपीआरचं ट्रेनिंग देणार आहेत. तसेच सोसायटी, क्लब व कॉलेजमध्ये कोणाला हे ट्रेनिंग हवे असेल तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनने आपात्कालीन परिस्थितीत सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी हे डॉक्टर केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हे ट्रेनिंग देत होते. मात्र आता आम्ही ते सर्वांना देण्यास सुरवात केली आहे. सीपीआरच्या प्रशिक्षणाचा हा उपक्रम एका तासाचा असतो. जर प्रशिक्षण घेणारा ग्रुप हा ५० जणांचा असेल तर पुणे आयएमएच्या हॉलमध्ये किंवा त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षित पोलीस आणि स्थानिक वाहतूक विभागाची लोक असणार आहेत. जर प्रशिक्षण घेणारा ग्रुप हा ५० जणांचा असेल तर पुणे आयएमएच्या हॉलमध्ये किंवा त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी डॉक्टर त्यांना येऊन हे प्रशिक्षण देणार आहे.