माझ्या मानसिक आजाराने खूप काही शिकवलं- दीपिकाने केला खुलासा

dipika

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – दीपिका पदुकोण हि खूप दिवसापासून मानसिक आजाराने त्रस्त होती. २००५ साली तिने तिच्या या आजराबाबत खुलासा होता. आणि ती त्या आजरातून बाहेरही पडली. आता तिने मानसिक आजाराबाबत पुढाकार घेतला असून ती आता मानसिक आजाराबाबत जनजागृती करत आहे. आणि तिने Live Love Laugh ही संस्था स्थापन केली आहे. न्यूयार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात ती बोलत होती.

मानसिक आजार असेल तर ती व्यक्ती वेडी आहे. असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे जी व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. ती अनेकदा आपल्या आजाराबाबत कोणाशी दिलखुलासपणे बोलत नाही. त्यामुळे मी मानसिक आजारबाबत बोलायचं ठरवलं आहे. असं दीपिका या कार्यक्रमा दरम्यान बोलत होती.

मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी निधी जमा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.हा आजार म्हणजे माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मी या आजारातून खूप काही शिकले. मी माझ्या आजारातून लवकर बाहेर पडले नाही. कारण मी माझ्या आजाराबद्दल बोलत नव्हते. असही दीपिका म्हणाली.