आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपला बांधा सुडौल दिसावा , स्तन भरीव दिसावे म्हणून ब्रेस्ट इंप्लांटची शस्त्रक्रिया अनेक महिला करतात. ब्रेस्ट इम्प्लांट ही एक प्रकारचा शस्त्रक्रिया आहे ज्याद्वारे स्तनाचा आकार सुधारला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये कृत्रिम साहित्याचा एक थर स्तनाच्या आत ठेवला जातो. पण या शस्त्रक्रियांचे अनेक धोके आहेत. जाणून घ्या ब्रेस्ट इम्प्लांटमुळे कोणता त्रास होऊ शकतो त्याबद्दल –
१) ब्रेस्ट इंप्लांटमुळे सिलिकॉन जेल किंवा सेलाइन जेल लीकेज होण्याचा धोका असतो. त्यामुळे चक्कर येणे, घाबरणे , थकवा यांसारख्या समस्या जाणवतात.
सेलाइन जेल लीकेज झाल्यामुळे बॅक्टरीअल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
२) ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीमुळे अंगावर चट्टे उठणे किंवा अॅलर्जीचाही त्रास होऊ शकतो.
३) ब्रेस्ट इंप्लांटमध्ये आर्टिफिशियल मेटीरीअलचा वापर केला जातो. मानवी शरीराची अशी प्रवृत्ती असते की ती बाहेरील गोष्टी नाकारते. त्यामुळे ब्रेस्ट आणि ब्रेस्टच्या जवळच्या भागात दुखु शकते किंवा सूज येते.
४) ब्रेस्ट इम्प्लांट करण्याचा दुसरा नकारात्मक प्रभाव म्हणजे शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर स्तन आकारात असमानता निर्माण होऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतर स्तनाचे आकार वेगवेगळे असू शकतात. जर ब्रेस्ट इम्प्लांट योग्य प्रकारे केले नाही तर स्तनांचे नैसर्गिक सौंदर्य देखील गमावू शकते.
५) ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीमुळे आसपासच्या भागात चट्टे , निशाण बनतात. जे आयुष्यभर राहतात.