आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चांगली झोप आरोग्यासाठी खुप आवश्यक असते. यासाठी आपण कोणत्या स्थितीत झोपतो, हे सुद्धा महत्वाचे ठरते. याचा आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. पालथे म्हणजेच पोटावर झोपल्याने शरीरासाठी घातक ठरू शकते. पोटावर झोपल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात ते जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
१) मान सतत एकाच बाजूला राहते. यामुळे डोक्यापर्यंत रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे डोकेदुखी, मान आखडणे, मान मुरगळणे असे त्रास होतात.
२) अपस्मारीचा विकार जडण्याची शक्यता असते. अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार असून यामुळे फिट येतात.
३) चेहऱ्याच्या त्वचेला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. पिंपल्स येतात. चेहऱ्यावरही दाब पडतो.
४) रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. स्नायूंना इजा होऊ शकते.
५) मणक्याचे आजार जडण्याचीही शक्यता असते.
६) पाठ दुखते तसेच पाठीच्या कण्याचा आकारही बदलतो.
७) अन्नपचनाचा त्रास बळावतो. पचनक्रियेवरही परिणाम होतो.