आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पायांच्या तळव्यात जळजळ होणे आता एक आजार झाला आहे. वयानुसार हे होत असते , पण आता कधी कधी हा त्रास वयाच्या आधीच होण्यास सुरुवात होते. अशावेळी पायात रक्तप्रसरण कमी प्रमाणात होते. चला जाणून घेऊ पायांच्या तळव्यातील जळजळ कसे दूर करता येईल
– पायांच्या तळव्यात जळजळ होत असेल तर गरम पाणी मध्ये मोहरीचे तेल टाकून त्यात काही वेळे पर्यंत पाय ठेऊन आराम करावा. यामुळे तळव्यातील जळजळ कमी होते.
– अदरकच्या रसात ऑलिव ऑयील मिसळून या तेलाने आपल्या तळव्यात मसाज करावा. यामुळे तळव्यांना खूप आराम मिळतो. हा एक उत्तम उपाय आहे याचा वापर रोज केल्यास लवकरच तुम्हाला या समस्या पासून बाहेर पडता येते. जर तुमच्या कडे ऑलिव ऑयील नसेल तर तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचाही वापर करू शकता.
– मिश्री आणि बटर एकत्रित करून या मिश्रणाला आपल्या पायांच्या तळव्यात लावल्याने तळव्यांना खूप आराम मिळतो.
– वाळलेल्या कोथिंबीरचा पावडर आणि खडीसाखर सम प्रमाणात घेऊन रोज सकाळी आणि संध्याकाळी याचा तुम्ही थंड पाण्यात सेवन करू शकता. यामुळे पायांच्या तळव्यातील जळजळ कमी होते.