आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुलींच्या भुवया या त्यांच्या सौंदर्याचा एक भाग आहे. मुली आपल्या भुवयांना वेगवेगळा आकार देऊन आपल्या सौंदर्यात अधिक भर टाकत असतात. परंतु, काही मुलींच्या भुवयांचा कलर जास्त काळा नसतो. त्यामुळे मुलींना त्यांच्या भुवया आवडत नाहीत. पण खालील टिप्सचा वापर तुम्ही तुमच्या भुवया अधिक डार्क करू शकता.
१) कापूस दुधामध्ये भिजवून ते आपल्या भुवयांना लावा. आणि १५ ते २० मी. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. व भुवयांवर क्रीम लावा.
२) तुमच्या आयब्रोवर तुम्ही रोज २० मी. लिंबाचा एक तुकडा ठेवा. नंतर ते पाण्याने धुऊन काढा. किंवा तुम्ही लिंबाच्या रसात नारळाचे तेल मिक्स करून हे मिश्रण जर तुमच्या आयब्रोवर लावले तर तुमच्या आयब्रो डार्क होण्यासाठी मदत होईल. असे तुम्ही रोज रात्री झोपताना करू शकता.
३) अंड्याचा पांढरा भाग बाजूला करून उरलेला पिवळा बलक पातळ करून घ्या. आणि ते मिश्रण भुवयांना लावा. ते तुमच्या भुवया डार्क करण्यासाठी मदत करतील.
४) तुमच्या बोटांच्या मदतीने कस्टर ऑइल तुमच्या भुवयांना लावा. आणि अर्ध्या तासाने ते धुऊन काढा. यामुळे तुमच्या भुवया डार्क होण्यास मदत होईल.