आरोग्यानामा ऑनलाइन टीम – अनेक लोक सकाळी उठल्यापासून ऑफिसला निघण्याचीच तयारी करत असतात. तरीही त्यांची शेवटच्या क्षणी गडबड सुरूच असते. एवढे करूनही ऑफिसमध्ये गेल्यानंतर झोप येते किंवा थकवा जाणवतो. समोर भरपूर काम दिसत असतानाही झोप आवरता येत नसल्याने काय करावे ते सूचत नाही. कधीतरी झालेलेल्या जागरणामुळे असे होऊ शकते. पण, तुम्हाला जर असे नेहमीच जाणवत असले तर वेळीच लक्ष दिले पाहिजे. यापाठीमागची कारणे जाणून घेतली पाहिजेत.
ही आहेत कारणे
1. एनीमिया
सतत झोप येण्यामागे एनीमिया हेदेखील एक कारण असू शकते. शरीरात लाल रक्तपेशींची कमतरत निर्माण झाल्याने एनीमियाची लक्षणे दिसू लागतात. यामुळे थकवा जाणवू लागतो.
2. डिप्रेशन
डिप्रेशन असल्यास पूर्णवेळ झोप येत नाही. सतत थकवा जाणवतो.
3. कमी पाणी
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर चिडचिड आणि थकवा जाणवू लागतो. झोप येऊ लागते.
4. अपूर्ण झोप
झोप पूर्ण होत नसेल तर थकवा जाणवू शकतो. यामुळे ऑफिसमध्ये आल्यानंतर थकवा जाणवू लागतो. झोपही येते.