आरोग्यानामा ऑनलाईन टीम : रात्री लवकर जेवण करून लवकर झोपल्याने आरोग्य चांगले राहते. म्हणूनच जूने लोक नेहमी हा सल्ला देतात. यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो. स्पेनमधील बार्सिलोना इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थमध्ये झालेल्या संशोधनात जेवणाच्या वेळेबाबत काही निष्कर्ष काढण्यात आले त्याबाबत जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१ रात्री नऊ वाजण्यापूर्वी जेवण केल्यास किंवा झोपण्याच्या दोन तास आधी जेवणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका नसतो.
२ रात्री लवकर जेवणाऱ्यांना ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता उशीरा जेवणाऱ्यांच्या तुलनेत कमी असते, इंटरनेशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे.
३ लोकांच्या झोपण्याची आणि जागे राहण्याच्या प्रक्रियेत यामुळे बाधा येते. तसेच शरीरातील अन्य प्रक्रियांवरही परिणाम होतो.
Visit : arogyanama.com