आरोग्यनामा ऑनलाईन- आई होण्यासाठी त्यांच्या तयारीबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. जर आपल्याला अकाली प्रसूती premature delivery होण्याचा धोका कमी करायचा असेल तर आपल्या रोजच्या आहारात माशांचा समावेश करा. अकाली बाळांना premature delivery जन्म देणार्या ३७६ महिलांचा अभ्यास केल्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. माशांमध्ये ओमेगा -३ फॅटी ॲसिडस्, डीएचए आणि ईपीए सारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.
जेव्हा गर्भधारणेच्या पहिल्या सहा महिन्यांत शरीरात हे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात तेव्हा अकाली प्रसूती होण्याचा धोका दहापटीने कमी होतो. मुख्य संशोधक डॉ. जर्दर ओलसन यांनी गर्भवती महिलांना आठवड्यातून किमान तीन वेळा मासे खाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या महिला मांस टाळतात त्यांच्यासाठी फिश-ऑयल सप्लीमेंट घेणे फायदेशीर ठरू शकते. ‘जर्नल ऑफ मेडिसिन’ च्या अंकात नुकतेच या अभ्यासाचे निकाल प्रकाशित झाले आहेत.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.