रात्री झोप येत नसेल तर करा ‘हा’ उपाय ; घ्या जाणून
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याचे बदलते जीवनमान, कामाचा व्याप, इंटरनेटचा वाढता वापर यामुळे अनेकांना झोपेच्या समस्या निर्माण होतात. व्यवस्थित झोप न झाल्यामुळे अनेकांचा दिवस कंटाळवाणा होतो. तसेच अनेकांची दिवसभर चिडचिड होते. त्यामुळे आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपली चांगली झोप होणे गरजेचे आहे.
पण वरील काही कारणामुळे अनेकांना रात्री चांगली झोप येत नाही. तुम्हाला जर रात्री चांगली झोप घ्यायची असेल तर तुम्हाला त्यावर काय उपाय करायचा ते आम्ही सांगणार आहोत. जाणून घेऊया रात्री झोप येण्यासाठी काय उपाय करावेत.
शरीराच्या तापमानावर झोपेची क्वॉलिटी अवलंबून असते. आपल्या झोपेमध्ये शरीराच्या तापमानाची महत्वाची भूमिका असते. झोपेच्या १-२ तास अगोदर अंघोळ केली तर त्या व्यक्तीला लवकर झोप येते. आपण रात्री झोपतो त्यावेळेस आपल्या शरीराच तापमान अतिशय कमी असते. त्यामुळे आपल्याला लवकर झोप येते.
त्यामुळे आपल्याला जर रात्री चांगली झोप यावी असे वाटत असेल तर झोपण्याच्या अगोदर २ तास अगोदर अंघोळ करा. यामुळे तुमच्या शरीराचं तापमान कमी होईल आणि तुम्हाला निवांत झोप लागेल.
Comments are closed.