आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आरोग्य चांगले रहावे म्हणून आपण नेहमी काळजी घेतो. परंतु, काही चुकीच्या सवयींमुळे या काळजी घेण्याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणून अशा सवयी ताबडतोब बंद केल्या पाहिजते. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे वॉशरूमला जाताना काही गोष्टी आत घेऊन जाऊ नये. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१ नकळतसुद्धा मोबाईल वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका. वॉशरूममध्ये मोबाईल हाताळल्यामुळे तिथे असलेल्या जंतू आणि जीवाणूंचा मोबाईलशी संसर्ग होतो. मोबाईल रोजची हाताळण्याची वस्तू असल्याने ते जंतू आपल्या हातालाही लागतात.
२ अनेक मुली वॉशरूममध्ये जाऊन मेकअप करतात. ही सवय खुप घातक आहे. वॉशरूममध्ये काजळ, लिपस्टिक अशा वापरल्याने डोळ्याचा व चेहऱ्याचा वॉशरूममध्ये असलेल्या आरशाशी जवळून संपर्क आल्याने तुमच्या चेहऱ्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
३ वॉशरूममध्ये बॅग किंवा खाऊची पिशवी घेऊन गेल्यास जीवाणूंचा बॅगमध्ये असलेल्या पदार्थाशी संपर्क होतो. हे जंतू पोटात जाऊन पोटाचे विकार होऊ शकतात.
४ चहा व कॉफीचं सेवन वॉशरूममध्ये केल्याने जीवाणूंशी संपर्क तर होतो. पचनसंस्थेवर देखील परिणाम होतो.
५ वॉशरूममध्ये जाताना आपल्या हातात असलेलं घड्याळ, अंगठी यांचाही जवळचा संबंध येतो. हात स्वच्छ धुवावे व हातातील वस्तूही व्यवस्थित पुसून घ्या.
Visit : arogyanama.com