आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध आरोग्य समस्यांमध्ये हळदीचे दूध पिणे लाभदायक असते. परंतु, उष्म आणि रक्त पातळ करणारा गुणधर्म असल्याने असे दूध सर्वांनाच लाभदायक ठरू शकत नाही. काहींना यामुळे त्रासदेखील होऊ शकतो. शरीरात गरमी, नाकातून रक्त येणे, पाईल्स, अशा समस्या असणारांना हळदीच्या सेवनाने त्रास होतो. यामुळे अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो. कोणी हळदीचे दूध पिऊ नये, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
ब्लीडिंगच्या समस्या
हळदीमध्ये औषधी गुणधर्म असले तरी ती प्रत्येकासाठी ती फायदेशीर नाही. मसाल्याव्यतिरिक्त हळदीचा कोणी वापर करत नाही. हळदीचे दूध अनेकजण पितात. गालब्लेडर स्टोन, प्रेग्नेंसी आणि ब्लीडिंगच्या समस्या असल्यास हळदीचा जास्त समावेश असलेले जेवण टाळावे.
या लोकांनी पिऊ नये
१ ज्यांना गॉलब्लॅडरची समस्या आहे.
२ जे रक्त पातळ करणारी औषधे घेतात.
३ प्रेग्नेंसी अथवा पीरियड्स दरम्यान.
४ ज्यांना गॅस अथवा अॅसिडिटीची समस्या आहे.