…तर झोपेच्या गोळ्यांचे सेवन ठरू शकते धोकादायक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बदललेल्या राहणीमानामुळे अनेक लोकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ही समस्या खुपच वाढत चालली असून काहीजण यावर झोपेच्या गोळ्या घेत असतात. काहींना झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय शांत झोपच लागत नाही. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
झोपेच्या गोळ्यांची ही सवय होणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बराच काळ या गोळ्यांचे सेवन केल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होतात. झोपेच्या गोळ्यांच्या दुष्परिणामांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, सतत झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याने ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. नियमितपणे झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याने वृद्धपकाळात हाय ब्लड प्रेशरच्या धोका वाढतो.
हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी ताण आणि हाय ब्लड प्रेशरन ग्रस्त असणाऱ्या जवळपास ७५० लोकांना सहभागी केले होते. यामध्ये असे आढळले की, जवळपास १५६ लोकांनी अॅन्टीहायपरटेंसिव औषधांच्या संख्येमध्ये वाढ केली. यामुळे झोपेची वेळ किंवा क्वालिटी आणि अॅन्टीहायपरटेंसिक औषधांच्या वापरामध्ये काही संबंध आढळून आला नाही. संशोधकांच्या मते,झोपेच्या गोळ्यांचे सेवन भविष्यामध्ये हाय ब्लड प्रेशरचे कारण ठरतात.