नवी दिल्ली, वृत्तसंस्था – महिलांच्या शरीरात सतत बदल होत असतात. या बदलांमुळे हार्मोन सतत कमी जास्त होत असतात. ज्याचा परिणाम महिलांच्या शरिरावर होत असतो. हर्मोनमध्ये बदल होत असल्याने डोके दुखीच्या त्रासाचा सामना महिलांना अनेकदा करावा लागतो. याचे कारण आहे शरिरातील एस्ट्रोजन हर्मोनचा स्तर कमी जास्त होणे. हे डोके दुखी खूपच जास्त गंभीर असू शकते. ज्याच्यावर तुम्ही काही उपाय करु शकतात. ज्यामुळे तुमची डोके दुखी थांबू शकते. हे आहेत ते उपाय ज्याने तुमची डोके दुखी थांबण्यास मदत होईल.
डायट –
तुमची डोके दुखी कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डायटमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. असे काही बदल केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. काही पदार्थांना कमी करुन तुम्ही तुमच्या जेवणात विटामिन बी चे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. याने शरीरतील हार्मोन्सचा स्तर नियंत्रित राहू शकतो.
तणाव कमी करा –
तणाव तुमच्या डोके दुखीला कारणीभूत ठरु शकतात, तणाव घेतल्याने शरीरातून हार्मोन्स असंतुलित होतात आणि यामुळे डोके दुखी वाढते. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन, वर्कआऊटची गरज आहे. यामुळे शरिरातील हार्मेन्सचे संतुलन योग्य राहते.
पाणी प्या –
जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता येते तेव्हा डोके दुखीची समस्या वाढते. डोके दुखीचे कारण शरीरातील पाण्याचे स्तर कमी होणे ही आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसभरातून कमीतकमी ३ लीटर पाणी पीने आवश्यक आहे.
मसाज –
सततच्या कामामुळे महिलांचे शरीरातील हर्मोन्स कमी जास्त होत असतात आणि यामुळे तुमचे डोके दुखण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यामुळे शरीराला मसाजची अत्यंत आवश्यक्ता असते.