आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही अपवाद सोडले तर आपल्याकडे अशी व्यक्ती सापडणार नाही की तिला सापाची भीती वाटत नाही. परंतु, शेतात काम करत असताना किंवा अडचणीच्या ठिकाणी अनेकांना अचानक साप चावतो. त्यावेळी आपण लवकर हॉस्पिटलमध्ये तर जाऊ शकत नाही. पण आपल्याला वेळेवर काय करावे. ते पण सुचत नाही. आणि कधीकधी आपल्याला नेमकं सापच चावलाय का ते ही कळत नाही. त्यामुळे साप चावल्याची लक्षणे आणि काय उपाय करायचे. ते आम्ही तुम्हाला खालील टिप्सद्वारे सांगत आहोत.
साप चावल्याची लक्षणे खालीलप्रमाणे :
उल्टी होणे,चक्कर येणे,थंडी ,चिकट त्वचा हे लक्षण आढळून आल्यास तुम्हाला साप चावलेला असू शकतो. साप चावल्यावर,ज्या जागी सपाने दंश केल्यावर त्या जागी काळे -निळे होते.जर आपण त्यावर लवकरात लवकर उपचार केले नाहीत तर ते विष राक्ताद्वारे पूर्ण शरीरात भिनते व त्यामुळे माणसाचा मृत्यूपण होऊ शकतो.
साप चावल्यावर करण्याचे उपाय खालीलप्रमाणे :
१) जर आपल्याला असे आढळून आले की आसपास कोणालातरी साप चावला आहे तर आपण त्यावर काही प्राथमिक उपचार करू शकतो, जसे की, त्या माणसाला जेथे साप चावला आहे. त्या ठिकाणी पटकन कापडाचा तूकडा बांधावा जेणे करून ते विष शरीरात पसरणार नाही.
२) त्या व्यक्तीला त्वरित दवाखान्यात घेऊन जावे अथवा तोंडाने विष चोखून थुंकून द्यावे. जर ते विष काही प्रमाणात तोंडात राहिले तर त्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते. व आपल्या तोंडातून फेस यायला लागतो.
३) ज्या ठिकाणी साप चावला आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर साबणाने स्वच्छ धुवून काढा. आणि अँटिसेप्टिक औषध लावा.
४) साप चावलेल्या व्यक्तीला हालचाल करू देऊ नका.
५) त्या व्यक्तीला लवकरात लवकर टिटनेसचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करा.