शरीर आतून शुद्ध नसेल तर येतो सतत थकवा, ‘हे’ आहेत संकेत
आरोग्यनामा ऑनलाईन – शरीरात विषारी पदार्थ म्हणजे टॉक्सिन्स जमा झाल्यानंतर सतत थकवा येतो. प्रदुषण, स्वच्छ पाणी न पिणे आणि योग्य आहार न घेतल्याने हे टॉक्सिन्स जमा होतात. यामुळे अनेक प्रकारचे आजारही होतात. शरीर आतून शुद्ध नसेल तर शरीराकडूनच काही संकेत मिळतात ते ओळखता आले पाहिजेत.
शरीर आतून स्वच्छ नसल्याचे समजण्यासाठी काही संकेत आहेत. त्यापैकीच एक म्हजणे थकवा येणे होय. शरीर आतून स्वच्छ न झाल्यामुळे शरीरात जाता फॅट जमा होते. यामुळे थोडेसे काम केल्यावरसुध्दा थकवा आणि कमजोरी येते. बॉडीमध्ये टॉक्सिन्स वाढल्यामुळे मेटाबॉलिज्म स्लो होते. अशा वेळी वजन वाढते. बॉडी चांगली क्लीन होत नसेल तर डायजेशन खराब होते. अशा वेळी बध्दकोष्ठतेची समस्या होते.
तसेच बॉडीमध्ये टॉक्सिन्स जमा झाल्यामुळे ब्लड स्वच्छ होऊ शकत नाही अशा वेळी पिंपल्स, अॅलर्जी आणि स्किन डिसिजसारख्या समस्या होतात. बॉडी क्लिन न झाल्यामुळे ब्लड सर्कुलेशन बिघडते. अशा वेळी डोकेदुखी होते. जर बॉडीमध्ये टॉक्सिन्स जास्त प्रमाणात जमा होत असतील तर डायजेशन खराब होते. अशा वेळी दुर्गंधी अॅसिड तोंडातून निघते. तसेच मसल्स आखडतात आणि वेदना होतात. बॉडीमध्ये टॉक्सिन्स जमा झाल्यामुळे लीव्हर गॉल ब्लेंडरमध्ये बाइल ज्यूस जमा करते. यामुळे गॉलब्लेंडरमध्ये स्टोनची समस्या होते.