आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे अलिकडे हृदयविकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हार्ट अॅटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यामुळे छातीत थोडे जरी दुखले तरी अनेकांना भिती वाटते. ज्यांना आर्थिक ताण आहे, अशा लोकांना हार्ट अॅटॅक येण्याचा धोका तब्बल १३ पटींनी वाढतो, असे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील संशोधकांनी म्हटले आहे.
काय सांगतात संशोधक ?
१. हृदयविकाराच्या संदर्भात ज्या इतर सर्वसामान्य बाबी आपण तपसतो आणि डॉक्टरही ज्यावर भर देतात, त्यापेक्षाही अशा पेशंट्सला आर्थिक कारणांमुळे काही ताण आहेत का, हे तपासले पाहिजे.
२. आर्थिक स्थितीमुळे आलेल्या टेन्शनकडे वेळीच लक्ष दिले गेले आणि पेशंट्सनाही त्याबाबत सावध केले तर हृदयविकारापासून हे रुग्ण दूर राहू शकतात.
३. ज्यांना आर्थिक ताण आहे, अशा लोकांना हार्ट अॅटॅक येण्याचा धोका तब्बल १३ पटींनी वाढतो.
४. आर्थिक ताणावर वेळीच प्रतिबंधक उपाय प्रत्येकाने योजले पाहिजेत.
५. ज्यांना अजून हृदयविकार नाही, अशा लोकांनी आर्थिक टेन्शन्स वाढायला लागल्यावर काळजी घेतल्यास हृदयविकार आणि आणि हार्ट अॅटॅकपासून सुटका होऊ शकते.
६. आर्थिक ताण येणार नाही, याकडे शक्यतो लक्ष द्यावे.
७. आर्थिक संकट सांगून येत नसले तरी त्याने काय होऊ शकते हे माहीत असले तर त्यापासून बचावाचे मार्गही आपण शोधू शकतो.