पायांची दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी ‘हे’ आहेत ७ रामबाण उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पायात सतत शूज घातल्याने काही व्यक्तींच्या पायांना दुर्गंधी येते. पायांमध्ये घामाच्या अनेक ग्रंथी असतात. या ग्रंथीमधून येणारा घाम पायांच्या बॅक्टेरियाशी मिळतो, त्यामुळे दुर्गंधी येण्याचे प्रमाण वाढते. पायांचा आणि बुटांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी काही खास उपाय आहेत. या उपायांची आपण माहिती घेवूयात.
हे उपाय करा
१) बुटांमधून दुर्गंधी येत असल्यास देवदारच्या लाकडांची साल किंवा लवंग बुटांमध्ये ठेवा. दुर्गंधी काही दिवसांत गायब होईल.
२) ब्लॅक टीचे सेवन केल्यास पायाला घाम येण्याचे प्रमाण कमी होते. ब्लॅक टी पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये टाकून त्यात १ चमचा मीठ मिसळावे. त्यामध्ये १ तास पाय ठेवावे. यामुळे पायाची दुर्गंधी नष्ट होते.
३) एक कप व्हिनेगर अर्ध्या बादली कोमट पाण्यात टाका आणि त्यामध्ये १५ मिनीटे पाय बुडवून ठेवा. दोन आठवडे रोज झोपण्यापूर्वी असे केल्यास पायाची दुर्गंधी दूर होईल.
४) सकाळी-संध्याकाळी पाय स्वच्छ पाण्याने धुवून काढा. वेळो-वेळी पायाला स्क्रब करा. त्यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि घामाचा दुर्गंध दूर होईल.
५) अर्धी बादली पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा टाका. त्यामध्ये २० मिनीटे पाय बुडवून ठेवा. आठवड्यातून कमीत-कमी दोनदा झोपण्यापूर्वी हा उपाय करावा. तुम्ही मोजे घालण्यापूर्वी पायावर बेकिंग सोडा लावू शकता. त्यामुळे बॅक्टेरिया मरतात आणि घाम येत नाही.
६) कोमट पाण्यात दोन चमचे खडा मीठ टाकून त्यामध्ये २० मिनीटे पाय बुडवून ठेवावे. त्यामुळे पायातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
७) अद्रक पाण्यात अर्धा तास उकळून घ्या. या पाण्यामध्ये अर्धी बादली थंड पाणी टाका. अर्धा तास या पाण्यात पाय बुडवून ठेवा. पाय मऊ होऊन पायाची दुर्गंधी सुद्धा नाहीशी होते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)
Comments are closed.