जाणून घ्या, काळ्या बाजारात किती आहे तुमच्या शरीरातील अवयवयांची किंमत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जगभरात माणसाच्या अवयवांची तस्करी हा बेकायदेशीर तसेच काळा धंदा सुरू आहे. काळ्या बाजारात मानवी रक्तापासून ते हृदयापर्यंत सर्व प्रकारचे अवयव विकले जातात. यासाठी गरजूला मोठी किंमत मोजावी लागते. या काळ्या बाजारात शरीराच्या कोणत्या अवयवांची किती किंमत असते, हे आपण जाणून घेवूयात.

अवयवांच्या किंमती

* काळ्या बाजारात दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किडनीची किमत आहे. किडनी काढून विकण्याचा धंदा काही लोक करतात. संपूर्ण जगभरात हा काळाधंदा पसरलेला आहे.

* हृदयाची काळ्या बाजारातील किंमत ११९ हजार डॉलरपेक्षा जास्त आहे.

* लिव्हर बदलण्याची आवश्यकता असेल तर काळ्या बाजारात १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमत मोजावी लागते.

* काळ्या बाजारात कोर्नियाची किंमत जवळपास पंधरा लाखांपेक्षा जास्त आहे. डोनर न भेटल्यास काळ्या बाजारातून हे खरेदी केले जाते.

* काळ्या बाजरात मानवी त्वचासुद्धा विकली जाते. एक इंच त्वचेची किंमत ६०० डॉलर पेक्षा जास्त आहे.

* एक ग्राम बोनमॅरोची किंमत २३ हजार डॉलरपेक्षा जास्त असते. भारतीय चलनानुसार ही किंमत पंधरा लाखाच्या पुढे आहे.

* काळ्या बाजारात एक ग्लास रक्ताची किंमत ३३७ डॉलर पेक्षा जास्त म्हणजे जवळपास २० हजार भारतीय रुपये एवढी आहे.

* अपत्यप्राप्तीसाठी फर्टायील अंड्याचे डोनेशन लीगल आहे. परंतु, काही लोक हॉस्पिटलची फी वाचवण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने फर्टायील एग विकत घेतात. अमेरिकेत प्रत्येक आयव्हीएफ सायकलसाठी १२,४०० यूएस डॉलर पेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. म्हणजे जवळपास ८ लाखापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते.

* काळ्या बाजारात १० इंच लांब केसांची किंमत ७० डॉलरपेक्षा जास्त आहे. भारतीय चलनानुसार साडेचार हजार रुपये होतात. या केसांपासून अनेक महागड्या वस्तू तयार केल्या जातात.