आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार सध्या सर्वत्र मोठ्याप्रमाणात दिसून येत आहेत. डेंग्यूसारख्या आजारात तर प्लेटलेट्स कमी झाल्याने रूग्णाचा जीव धोक्यात येतो. या आजारांवर डॉक्टरांचे उपाय सुरू असतानाच काही घरगुती उपाय केल्यास चांगला फरक दिसून येतो. डेंग्यू, मलेरिया, हार्ट अटॅक, डायबेटीज, डेंग्यू आणि कॅन्सर यासारख्या आजारात पपईच्या पानांचा रस लाभदायक ठरतो. पपईच्या पानांमध्ये डेग्यूंचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इन्फेक्शनपासून बचाव होतो. पपईच्या पानांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 प्लेटलेट वाढतात
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील प्लेटलेट्स आणि आरबीसी काउंट वाढतो. ब्लड सर्क्युलेशनही वाढते. डेंग्यूच्या रूग्णांना पपईच्या पानांचा रस घ्यावा.
2 कॅन्सर
पपईच्या पानांच्या रसामध्ये अॅन्टी-ट्यूमर गुणधर्म भरपूर असल्याने कॅन्सरचे काही प्रकार, विविध प्रकारच्या अॅलर्जीपासून बचाव होतो.
3 रोगप्रतिकारक शक्ती
पपईच्या पानांच्या रसात अॅन्टीऑक्सिडंट भरपूर असल्याने याचा ज्यूस प्यायल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि किडनी, लिव्हर आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होते.
4 बद्धकोष्ठता, मूळव्याध
पपई लॅक्सेटिव्ह असल्याने बद्धकोष्ठता दूर होते. पानांचा रस प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात.