आरोग्यनामा ऑनलाईन टीम – देशी गायीच्या तुपात जबरदस्त ताकद असून यास आयुर्वेदात खुप महत्व आहे. हे तुप नियमित योग्यपद्धतीने सेवन केल्याने तारुण्य जास्त काळ टिकवता येते. तसेच शरीराचा विकास आणि रोग दूर ठेवण्यासाठी हे लाभदायक आहे. तुप सेवन केल्याने शक्ती, वीर्य आणि आयुष्य वाढते. याचा वापर करून तुम्ही सौंदर्य सुद्धा वाढवू शकता. याविषयी माहिती घेवूयात.
१) चमकदार चेहरा
चेहरा चमकदार हवा असल्यास नियमित तुप लावावे. यामुळे नैसर्गिक ग्लो टिकून राहतो. तुपाने २० मिनिट मसाज करून १५ मिनिटे थांबा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
२) सुरकूत्या
हे अँटीएजिंग असल्याने याच्या नियमित मसाजाने कोशिका निरोगी राहतात. सुरकुत्या गेल्याने तरुण दिसता.
३) डार्क सर्कल
रात्री झोपण्यापुर्वी डोळ्यांखाली तुप लावा. सकाळी साध्या पाण्याने डोळे धुवून घ्या. नियमित केल्याने चांगला फरक दिसून येतो.
४) डोळ्यांचा थकवा
डोळ्यांच्या चारही बाजूंनी तूप लावून मसाज केल्याने रक्ताभिसरण जलद होते. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. थकवा दूर होतो.
५) गुलाबी ओठ
फाटलेल्या ओठांवर शुध्द तुपाने मसाज करा. तसेच यामुळे काळे ओठ गुलाबी होतात.
६) मुलायम त्वचा
यामुळे कोरडी त्वचा मऊ होते. हे त्वचेच्या कोशिकांपर्यंत सहज पोहोचते. तुप थोडेसे कोमट करा. ५ मिनिटे या तुपाने मसाज करा. अर्धा तासानंतर अंघोळ करा.
७) मॉश्चरायजर
हे मॉश्चरायजरचे काम करते. तुप आणि पाणी समान प्रमाणात घेवून या मिश्रणाने मसाज करा. १५ मिनिट तसेच ठेवून नंतर गार पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून २-३ वेळा असे केल्यास चेहरा मुलायम होतो.