आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लसून खाद्यपदार्थांची लज्जत वाढवतो हे सर्वांनाच माहित आहे. लसणाचा दुसरा गुण म्हणजे लसून हा औषधी आहे. आंतराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या शोध पत्रांनुसार लसून कमीतकमी १५० प्रकारच्या रोगांवर रामबाण औषध आहे. विशेष म्हणजे कँसर, डायबिडीज, हृदयरोग, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स इत्यादी समस्या नियंत्रणात ठेवण्याची क्षमता लसणात आहे. ज्या तीन रोगांमुळे जगात सर्वाधिक मृत्यू होतात, त्या रोगांवर लसून स्वस्त, सुरक्षित आणि गुणकारी उपाय असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. संशोधकांनी लसणाचे हे गुण मान्य केले आहेत.
सायटिका
एक कप तिळाच्या तेलात ८ लसणाच्या पाकळ्या टाकून गरम करा. तेल थंड झाल्यावर या तेलाने कंबरेपासून तर मांड्यापर्यंत मालिश करा. यामुळे सायटिकापासून आराम मिळेल.
हृदयरोग, गॅस
कोरड्या लसणाच्या १५ पाकळ्या १-२ कप दूध आणि ४ कप पाण्यात उकळून घ्या. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. हे मिश्रण गॅसची समस्या आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांना द्यावे.
संधीवात, जंत
संधीवाताचा त्रास असल्यास लसणाच्या कच्च्या पाकळ्या चावल्याने फायदा होतो. लहान मुलांना पोटात जंत झाल्यास लसणाच्या पाकळ्यांचा २०-३० थेंब रस काढून एक ग्लास दूधामध्ये मिसळून मुलाला प्यायला द्यावे.
जखम
मोहरीच्या तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक करुन टाका आणि हे मिश्रण गरम करा. हे तेल जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते.
रक्तदाब, रक्तशुद्धी
उच्च रक्तदाब असल्यास नियमित सकाळी लसणाच्या कच्च्या पाकळ्या चावून खाव्यात. मीठ आणि लसणाचे सेवन केल्यास रक्त शुध्द होते.
रक्तपेशी
रक्तातील पेशींची कमतरता असल्यास मीठ आणि लसणाचे सम प्रमाणात सेवन करावे.
सर्दी, खोकला, ताप
लसणाच्या नियमित सेवनाने सर्दी-खोकला आणि ताप सुद्धा बरा होतो.
दमा
लसणाच्या दोन कच्च्या पाकळ्या सकाळी उपाशापोटी चावा. याच्या अर्ध्या तासानंतर अर्धा चमचा ज्येष्टमध पावडरचे सेवन करा. हा उपाय दोन महिने नियमित केल्यास दमा बरा होतो.
५० ग्राम भोपळा आणि लसणाच्या १० ग्राम पाकळ्या बारीक करुन घ्या. हे अर्धा लिटर पाण्यात उकळा. पाणी अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा. आता हे पाणी गाळून घ्या. या पाण्याने गुळण्या करा. दातदूखी दूर होईल.
कानाची समस्या
कानात किडा गेल्यास सूर्यफूलाच्या तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून गरम करा. तेल थंड झाल्यानंतर काही थेंब कानात टाकता. यामुळे कानात गेलेला किडा बाहेर येतो.