व्हिनेगरचे ‘हे’ १७ उपयोग आहेत लाभदायक, जे अनेकांना माहित नाहीत
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – व्हिनेगरचा वापर जेवणात मोठ्याप्रमाणात केला जातो. तसेच याचे इतरही खूप उपयोग आहेत. विविध प्रकारच्या घरगुती औषधांमध्ये याचा वापर केला जातो. व्हिनेगरचा उपयोग पाश्चात्य, यूरोपीय आणि एशियायी देशात जेवणात केला जातो. जेवणात वापरण्यात येत असलेल्या व्हिनेगरमध्ये ४ ते ८ टक्के अॅसीटिक आम्ल असते. व्हिनेगरचे अनेक उपयोग असून ते आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत उपयोग
* अनेकदा अखंड स्टिकर काढता येत नाही. ते अर्धवट तसेच राहते. यामुळे भांडे अथवा इतर वस्तू चांगली दिसत नाही. असे स्टीकर सहज काढण्यासाठी व्हिनेगर गरम करून एक कपडा भीजवा आणि स्टिकरवर थोडा वेळ ठेवा. यामुळे स्टिकर सहज निघून जाईल.
* जेव्हा किचनच्या सिंकची नळी जाम होते तेव्हा अर्धाकप बेकिंग सोड्यात पांढरे व्हिनेगर टाका. हे मिश्रण नळीमध्ये टाकल्यावर ती स्वच्छ होईल.
* ऐथलीट फीट, पायांच्या नखांवर संसर्ग आणि कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी व्हिनेगर फायदेशीर आहे. यामुळे संसर्गाच्या जागी व्हिनेगर लावल्यास ही समस्या दूर होते.
* जेवणात तिखट जास्त झाल्यास अन्न फेकण्याऐवची त्यामध्ये थोडे व्हिनेगर टाकल्यास तिखटपणा कमी होतो.
* लोखंडाच्या एखाद्या वस्तुवर गंज चढला तर व्हिनेगर एका भांड्यात गरम करा. या भांड्यात गंज लागलेली वस्तु टाका आणि काही वेळ राहू द्या. नंतर हे चांगल्या पाण्याने धुवून घ्या.
* अॅपल व्हिनेगरमुळे ब्लडमध्ये शुगर लेव्हल नियंत्रित राहते. कारण इन्सुलिन मुक्त शर्करेला चरबीच्या रुपात संचित ठेवू शकत नाही.
* घरात मुंग्यां होत असतील तर सफेद व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेवून हे मिश्रण मुंग्यावर टाका. मुग्या पळून जातील.
* मांसपेश्यांमध्ये वेदना होत असतील तर एक कप पाण्यात २-३ चमचे व्हिनेगर टाका आणि दुखत असलेल्या भागावर कपड्याने लावा. वेदना थांबतात.
* घरात दुर्गंधी येत असल्यास तर व्हिनेगरचा वापर करा. व्हिनेगरमधील अॅसिटिक अम्ल दुर्गंध दूर करते. हे घरात शिंपडल्यावर दुर्गंधी दूर होते.
* केसांना शायनी बनवण्यासाठी एक कप पाण्यात अर्धा चमचा व्हिनेगर मिसळून केसांना लावा. हे केसांसाठी एका चांगल्या कंडिशनरचे काम करते.
* फ्रिज किंवा फरशी स्वच्छ करताना पाण्यामध्ये व्हिनेगर टाका आणि फ्रिज किंवा फरशी स्वच्छ करा. दुर्गंधी दूर होईल.
* कपड्याच्या खराब डागांना दूर करण्यासाठी व्हिनेगर लावा. नंतर कपडे धुवा. डाग गायब होतील.
* कपड्यांना मुलायम करण्यासाठी कपडे धुन्याअगोदर मशीनमध्ये पांढरे व्हिनेगर टाका.
* फुलांना ताजे ठेवण्यासाठी फूलांवर पाण्यात व्हिनेगर टाकून शिंपा.
* सतत उचकी येत असेल एक चमचा व्हिनेगरचे सेवन करा.
* जर जेवण जळाले, भाजी जळाली तर घराती दुर्गंध येते. ही दुर्गंध दूर करण्यासाठी एका वाटीत थोडेशा पाण्यात व्हिनेगर मिक्स करुन ठेवा. दुर्गंध दूर होईल.
* गळ्याची खाज दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळवा आणि त्या पाण्याने गुळण्या करा. यामध्ये काही चमचे मध देखील टाका लवकर फायदा होईल.
Comments are closed.