आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक महिलां लांब नखे ठेवतात. नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी त्या नेलपेन्ट, नेल आर्टचा उपयोग करतात. मात्र घरातील काम करताना ही लांब वाढवलेली नखे तुटतात. यासाठी नखे मजबूत होणे आवश्यक असते. एक आठवड्यापेक्षा अधिक काळ नेलपेन्ट नखांवर ठेवू नका. नेलपेन्ट अधिक काळ नखांवर राहिली तर नखे खराब होतात. मजबूत नखांसाठी कशी काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.
अशी घ्या काळजी
१) स्वच्छता
गरम पाणी आणि साबणाचे मिश्रण तयार करून त्यात दोन्ही हात बुडवून ठेवा काही वेळाने स्क्रबरच्या साहाय्याने नखे स्वच्छ करा.
२) अंड्याचा वापर
अंड्याच्या आतील पिवळा भाग दुधामध्ये मिसळून त्याचे मिश्रण नखांना लावा. याने काही वेळ मालीश करा. यामुळे नखे मजबूत आणि चमकदार होतील. डायटमध्ये कॅल्शियम असणे गरजेचे आहे.
३) ऑलिव्ह ऑइल
एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये तीन ते चार चमचे लिंबाचा रस टाका आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी नखांना लावा, यामुळे नखे मजबूत होतात.
४) नारळाचे तेल
नारळाचे तेल कोमट करुन नखांना मालीश करा. यामुळे नखे मजबूत होतात.
५) सफरचंदाचा रस
एक चतुर्थांश सफरचंदाच्या रसामध्ये अर्धा कप बीअर आणि ऑलिव्ह ऑइल यांचे एकत्र मिश्रण तयार करा. आता या मिश्रणामध्ये दोन्ही हातांची नखे पाच मिनिटे बुडवून ठेवा आणि बाहेर काढून नंतर मालीश करा. यामुळे नखे मजबूत होतात.
हे लक्षात ठेवा
* नखांना आकार देताना क्युटीकल म्हणजेच नखांच्या सुरुवातीच्या त्वचेची काळजी घ्या. नख कापताना ते एकाच बाजूने कापावे आणि शेप देखील एकाच बाजूने द्यावा, वेगवेगळ्या जागांवरून शेप दिल्यास नखे लवकर खराब होतात.
* रात्री कोल्ड क्रिमने नखांची मालीश करा. यामुळे नखांचे आरोग्य चांगले राहते.
* लांब नखांच्या सुरक्षेसाठी बाजारात प्लास्टिकची कॅप मिळते, त्याचा उपयोग करा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)