‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुलींचे सौंदर्य हे त्यांच्या केसांमध्ये असते. त्यामुळे त्या आपल्या केसांची खूप काळजी घेत असतात. पण काही मुलींचे केस हे कुरळे असतात. त्यामुळे त्यांना त्या केसांना काय करावे तेच कळत नाही. कारण केस कुरळे असतील तर त्यांना केस मोकळे सोडता येत नाही. कुरळ्या केसांची हेयर स्टाईलही करता येत नाही. त्यामुळे या केसांना मुली वैतागून जातात. पण तुम्ही हे जर हे खालील घरगुती उपाय केले तर तुमचे कुरळे केस सरळ होण्यास नक्कीच मदत होईल.

१) एरंडेल तेल :

तुमचे केस जर कुरळे असतील आणि तुम्हाला जर ते सरळ करायचे असतील तर तुम्ही गरम एरंडेल तेलाने मालीश करा आणि गरम टॉवेलने केसांना वाफ द्या.  आणि अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर हलक्या शाम्पूने  केस धुऊन टाका. हे  आठवड्यातून दोनदा करता येईल.

२) केळी आणि मध :

दोन केळी स्मॅश  करून त्यात २ चमचे मध, २ चमचे ऑलिव्ह तेल आणि २ चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या पूर्ण केसांवर लावून शॉवर कॅपने केस कव्हर करा. नंतर अर्ध्या तासाने केस धुऊन टाका. त्यामुळे तुमचे केस सरळ होण्यासाठी मदत होईल.

३) मुलतानी माती :

कुरळ्या केसांना जर सरळ करायचे असेल तर त्यासाठी १ कप मुलतानी मातीमध्ये एक अंड्याचा पांढरा भाग आणि २ चमचे तांदळाचे पीठ मिसळून घ्या. मिश्रण तयार करायला पाण्याची गरज भासल्यास त्यात पाणी टाकावे. हे मिश्रण केसांना लावून कंगवा करून घ्या. एका तासाने पाण्याने केस धुऊन टाका. आता केसांवर दुधाने स्प्रे करा. नंतर केस धुवून टाका.

४) ऑलिव्ह ऑयल आणि अंडे :

केस सरळ करण्यासाठी अगोदर २ अंडी फेटून घ्या.  यात ४ चमचे ऑलिव्ह तेल घाला. हे केसांना लावून कंगवा फिरवा. नंतर शॉवर कॅप घाला आणि ४५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर केस धुऊन टाका.