आरोग्यनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिमला जाणे सुरू करतात. परंतु, कामाचा व्याप आणि दररोजची धावपळ यामुळे यात सातत्य रहात नाही. अनेकदा जिम अर्ध्यावर सोडावी लागते. तर कधीकधी वेळच मिळत नाही. परंतु, जिम सोडल्यानंतर फिटनेसच्या तक्रारी पुन्हा निर्माण होतात. वजन वाढणे, वजन घटणे, अन्य शारीरिक दुष्परिणाम होतात. काही फळांचा, पदार्थांचा आहारात समावेश केल्यास जिममध्ये केलेली मेहनत वाया जाणार नाही. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहारात घ्या
1 पालक
पालकमध्ये फायबरचे प्रमाण प्रचंड असते. आपल्या शरीरात फायबर अतिशय सहजरित्या पचते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्याही कमी होते.
2 अंडे
यामध्ये प्रोटीन असल्याने कॅलरी बर्न होतात. शरीर सुदृढ राहते. ऊर्जादेखील वाढते.
3 अॅव्होकाडो
यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्यास मदत होते. यातील फायबरमुळे वारंवार भूक लागत नाही. शरीरातील साखरचे प्रमाणही संतुलित राहते.
4 सफरचंद
वजन घटवण्यास मदत होते. फॅट्स कमी होते.
5 काकडी
काकडी सेवन केल्याने शरीरातील दुषित घटक बाहेर फेकण्यास मदत होते. यातील पोषक तत्व असतात. यात कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फायबर भरपूर असतात.