आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली त्वचा काळी दिसू लागते यामुळे आपला चेहरा खराब दिसतो. परंतु आपण घरगुती सनस्क्रीन लोशन तयार करून वापरू शकता. जे आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देईल आणि त्वचेला सुंदर ठेवण्यास मदत करेल,
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
तीळ-ऑलिव्ह लोशन-
तिळाचे तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी ४० मिली तिळाचे तेल, १० मिली ऑलिव्ह तेल आणि १० मिली बदाम तेल एकजीव करून मिश्रण तयार करून करून घ्या. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा हे टॉनिक म्हणून काम करेल.
डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या
शरीरासाठी कैलेंडुला लोशन-
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला सॅनटॅनपासून वाचवण्यासाठी एका काचेच्या भांड्यात अर्धा कप बेस क्रीम, १ चमचा कैलेंडुला लोशन, आणि १ चमचा एवोकॅडो तेल मिक्स करावे, त्यानंतर ते हवाबंद कंटेनरमध्ये भरा आणि दररोज आंघोळ केल्यावर आपण ते शरीरावर लावू शकता.
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
गुलाबाच्या पाण्याचे लोशन-
त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी गुलाबपाणी सर्वोत्तम लोशन आहे. हे टॅनिंगपासूनच संरक्षण करते तसेच त्वचा मऊ देखील ठेवते. यासाठी टोमॅटोच्या रसात २ थेंब लिंबाचा रस आणि १ चमचा गुलाब पाणी घाला आणि हे लोशन चेहऱ्यावर लावा.
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
द्राक्ष बियाणे लोशन-
द्राक्ष बियाणे त्वचा आणि केसांसाठी एक अतिशय उपयुक्त घटक आहे. यात सर्व व्हिटॅमिन ई, सी, बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडेंट्स आणि फॅटी ॲसिड असतात, ज्यामुळे त्वचा आणि केस मजबूत आणि पोषक राहण्यास मदत होते. यासाठी अर्धा कप बेस क्रीम, १/४ कप द्राक्ष बियाणे तेल, १ चमचा व्हिटॅमिन ई तेल एका काचेच्या भांड्यात घ्या, चांगले मिसळा आणि नंतर ते हवाबंद पात्रात भरा. आपण आंघोळ केल्यावर त्याचा वापर करू शकता.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय