वेदना दूर करतात ‘या’ गोष्टी, पेनकिलर घ्यावे लागणार नाही, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखादा अवयव दुखत असल्यास असह्य वेदना होऊ लागतात. अशाप्रकारच्या वेदना होत असतील तर त्या दूर करण्यासाठी काही विशिष्ठ पदार्थांचे सेवन करून घरगुती उपाय करता येऊ शकतात. यामुळे दुखणे थांबू शकते. शिवाय, आरोग्यही चांगले राहू शकते. घरगुती उपायांनी वेदना कशा थांबवाव्यात याची माहिती आपण घेणार आहोत. पेनकिलरचे काम करणारे हे उपाय जाणून घेवूयात.

हे उपाय करा

* दररोज गाजराचा रस प्यायल्याने सांधेदुखी, जिने चढताना गुडघे दुखणे, दिवसभर कॉम्प्युटरवर बसून संध्याकाळी मान किंवा कंबर दुखणे यामध्ये आराम मिळतो. आवळ्याचा रस मिसळल्यास हे अधूक गुणकारी होते.

* दुध आणि पाणी सम प्रमाणात घेऊन लसुन आणि वावडिंग त्यामध्ये उकळून घ्या. थोड्यावेळाने दुध गाळून थंड करून प्या. या उपायाने मांसपेशी मजबूत होतात. लसुन आणि उडदाचे वाडे तिळाच्या तेलात टाळून खाल्ल्यास संधिवात आणि इतर आजारांमध्ये आराम मिळेल.

* दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताचे दुखणे दूर होते.

* अद्रक आणि सुंठ वात रोगांमध्ये सर्वात उत्तम औषध आहे. शरीरातील एखादा अवयव दुखत असेल तर सुंठ चूर्णाची वाफ घ्यावी. वेदनेपासून त्वरित आराम मिळेल.

* जायफळाचे आणि मोहराचे तेल एकत्र करून सांधे आणि सूज आलेल्या ठिकाणी मालिश केल्यास आराम मिळेल.

* जायफळ चूर्ण मधासोबत खाल्ल्यास संधिवाताच्या वेदना कमी होतात.

* जायफळ बकरीच्या दुधामध्ये उगाळून याचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखीमध्ये त्वरित आराम मिळेल.