आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वातावरणात कोणत्याही प्रकारच्या हानीकारक वायूचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा दुष्पपरिणाम आपल्यावर होतो. या दुष्परिणामाची प्राथमिक लक्षणे अप्रत्यक्षपणे जाणवू लागतात. याकडे दुर्लक्ष केल्यास शेवटी श्वसनाचे आजार तसेच कर्करोग असे मोठे आजारही होण्याची शक्यता असते. तसेच प्रदुषणामुळे लहान मुले न्यूमोनिया आणि अस्थमा अशा रोगांना बळी पडतात, असे संशोधनात आढळून आले आहे.
खोकल्याचे प्रमुख कारण
खोकल्याचे प्रमुख कारण हे प्रदूषणच असते. प्रदूषणयुक्त वातावरणात जास्तीत जास्त राहिल्यास खोकल्याचा त्रास हा हमखास होतो. वायूप्रदूषण मानवी शरीरातील फुप्फुसाच्या शेवटी असलेल्या टीआरपीए १ नावाच्या घटकाचे नुकसान होते.
असा करा बचाव
वायू प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. हवाई गुणवत्ता निर्देशंकाची माहिती करून घ्यावी. वाढलेल्या तापमानाचा अंदाज घेता शक्य तेवढे बाहेर जाण्याचे टाळा प्रवासाच्या वेळी चेहरा पूर्णपणे झाका आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या. प्रदूषणयुक्त हवामानात व्यायाम करणे टाळा. मास्क वापरा.