प्रदूषणापासून करा “केसांचा” बचाव
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणची समस्या वाढली आहे. आणि यामुळे मानवी आरोग्यास खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीही सगळयांना या प्रदूषणात वावरावे लागत आहे. यातून अनेक आजार उध्दभवतात. यामुळे केसांनाही मोठी हानी पोहचते. आणि मुलीचे सौंदर्य तर खरे केसातच असते. त्यामुळे त्या केसांची सतत काळजी घेत असतात. परंतु वातावरणातील प्रदूषणामुळे केस खराब होतात. आणि आपल्याला त्याचे योग्य कारण सापडत नाही. परंतु आपले केस खराब होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्रदूषण आहे. आपण प्रदूषणापासून खालील पद्धतीने केसांचा बचाव करू शकतो.
प्रदूषणापासून केसांचा बचाव कसा करावा ते पुढीलप्रमाणे
१) हवेतील कणांमुळे केस खराब होतात. हव आणि त्वचेला हानी पोहोचवतात. प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केस धुतल्यानंतर केसांना सिरम लावणं गरजेचं आहे.
२) मॉईश्चराईज कमी झाल्याने केसांचं नुकसान होतं. त्यामुळे केसांना शॅम्पु किंवा कंडिक्शनर लावणं गरजेचं आहे.
३) प्रदूषणामुळे केसांमध्ये कोंडा होतो. त्यामुळे केसांना मेहंदीमध्ये लिंबू टाकून मेहंदी लावली. किंवा दही लावलं तर केसातील कोंडा नष्ट होईल.
४) केसांना फाटे फुटतात. त्यासाठी केसांना रात्री तेल लावणे आवश्यक आहे. आणि तेल लावून घराच्या बाहेर पडू नका. कारण तेलामुळे केसांवर जास्त धूळ बसते. आणि केस जास्त खराब होतात.
५) सध्या मुलींमध्ये नवनवीन हेअरस्टाईलचा ट्रेन्ड आला आहे. त्यामुळे मुली बाहेर पडताना केस मोकळे सोडून जातात. परंतु असे केल्याने केस खराब होतात. त्यामुळे घराबाहेर पडताना केस उघडे ठेऊन नका.
६) केसांवर प्रदूषणाचा मारा झाला तर केस गळण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपण प्रदूषणापासून केसांचा योग्य पद्धतीने बचाव करणे गरजेचे आहे. तरच केसांच्या समस्या उद्भवणार नाहीत.