सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धकाधकीच्या जीवनामुळे अलिकडे रक्तदाबाचा त्रास अनेकांना जाणवत आहे. ही समस्या वेगाने वाढत असल्याचेही दिसून येते. हाय बीपी आणि लो बीपीची समस्या असल्यास त्या रूग्णाला नियमित गोळ्यांचे सेवन करावे लागते. परंतु नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती बाब म्हणजे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लहान मुला-मुलींना हाय बीपीचा धोका वाढू शकतो. जन्मावेळी किंवा गर्भावस्थेत व्हिटॅमिन डी चा योग्य आहार मिळाला नाही तर त्या बाळांना ही समस्या होऊ शकते, असे संशोधनात दिसून आले आहे.

हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी बॉस्टन मेडिकल सेंटरमध्ये जन्मापासून ते १८ वयाच्या ७७५ मुलांचा अभ्यास केला असता व्हिटॅमिन डी चे प्रमाण जन्मावेळी गर्भनाळ रक्तात ११ एनजी, एमएल पेक्षा कमी आढळले. गर्भावस्था किंवा बालपणी व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात न मिळाल्याने ६ ते १८ वयापर्यंत लहान मुलांमध्ये हाय सिस्टोलिक ब्लड प्रेशरची समस्या ६० टक्क्यांनी वाढते, असा निष्कर्ष या प्रयोगातून काढण्यात आला. गर्भावस्था किंवा सुरूवातीच्या बालपणात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते.

अन्यथा, हाय सिस्टॉलिक ब्लड प्रेशर रीडिंगने डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर रीडिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असूनही हृदयरोगाचा धोका वाढवतो, असे या संशोधनात सांगण्यात आले आहे. या संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला की, लहान मुलांना गर्भात असताना आणि बालपणी जर व्हिटॅमिन डीने युक्त आहार दिला गेला तर त्यांची हाय बीपीची समस्या कमी करण्यास मदत मिळू शकते. तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांची नियमित रक्तदाब चाचणी करणे आवश्यक आहे. यामुळे हाय बीपीपासून मुलांना वाचवता येऊ शकते.

शरीरातील हाडांना मजबूती देणारे कॅल्शिअम अब्जॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. हे व्हिटॅमिन डी शरीर तयार करते आणि सूर्यापासूनही ते मिळते. तसेच काही प्रमाणात अंडी, रावस मासे आणि दुधातून ते शरीराला मिळते. तसेच व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट्स घेऊनही त्याची कमतरता दूर करता येते.