आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हार्टच्या इलेक्टिड्ढकल सिस्टममधील ब्लॉकेजला हार्ट ब्लॉकेज म्हटले जाते. ही सिस्टम हार्ट बीट रेट आणि रिदम निश्चित करते. तसेच इलेक्ट्रिकल सिग्नलने संपुर्ण शरीराला रक्तपुरवठा केला जातो. हे इलेक्ट्रिकल सिग्नल एखाद्या कारणामुळे थांबले तर हार्ट ब्लॉकेजची शक्यता निर्माण होते.
* हार्ट ब्लॉकेजपासून बचाव करण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटी खूप महत्त्वाच्या असतात.
* डायटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश करावा. काही खास पदार्थ सहज आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात. याचा रोज वापर केल्याने हार्ट ब्लॉकेजची समस्या कंट्रोल केली जाऊ शकते.
१ दुध आणि आवळा
एक ग्लास दुधामध्ये आवळा पेस्ट टाकून प्या. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होईल आणि हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी होईल.
२ दुधी भोपळा
दुधी भोपळा उकडून घ्या. यात जिरे, हळद आणि कोथेंबिर टाकून खा.
३ उडीद डाळ
रात्री ४ ते ५ चमचे उडीद डाळ पाण्यात भिजत टाकून सकाळी बारीक करून दुधात मिसळून घ्या.
४ टोमॅटो
रोजच्या जेवणामध्ये टोमॅटोचा समावेश करा, यामुळे हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी होईल.
५ तूप आणि गुळ
जेवणानंतर नियमित तूप आणि गुळ खा. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होतील.
६ लिंबू पाणी
७ गाजर आणि मध
आठवड्यात दोन ते तीन वेळा गाजरच्या ज्यूसमध्ये मध मिसळून प्या.
८ बदाम आणि मिरे
तीन बदाम आणि चार मिरे घेवून त्याची पावडर करा. यामध्ये चिमूटभर तुळशीची पावडर टाकून पाण्याबरोबर घ्या.
९ लसूण
नियमित सकाळी लसणाच्या एक ते दोन पाकळ्या चावून खा.