आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात होणारा व्हायरल फिव्हर हा सामान्य आजार आहे. मात्र, या काळात हा आजार वेगाने पसरत असल्याने वेळीच काळजी घेणे महत्वाचे असते. व्हायरल फिव्हरमुळे शरीराचे तापमान वाढते. तसेच नाक गळणे, पडसे, अंगदुखी, घशात खवखव असा त्रास होतो. यासाठी कोणते उपाय करावेत, याविषयी जाणून घेवूयात.
व्हायरल फिव्हर
व्हायरल फिव्हर विविध इन्फेक्शनमुळे होतो. एखाद्या खास व्हायरसमुळे ही समस्या होत नाही. संकेत पाहून अशा प्रकारच्या तापावर उपचार करावे लागतात. दूषित हवेत श्वास घेतल्याने श्वासाच्या माध्यमातून हे व्हायरस बॉडीमध्ये जाऊ शकते. यामुळे व्हायरल फिव्हर होऊ शकतो. तसेच एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे व्हायरल फीव्हर होऊ शकतो.
हे आहेत संकेत
* बॉडीचे टेम्प्रेचर वाढणे.
* थंडी आणि अंग थरथरणे.
* सर्दी-पडसे, नाक गळणे
* उल्टी किंवा डायरिया होणे.
अशी घ्या काळजी
१ उकळून गार केलेले पाणी प्या.
२ घरात वापरले जाणारे टॉवेल दररोज धुवा आणि बदला.
३ खोकताना तोंडावर हात ठेवा.
४ मच्छरांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी अथवा रेपेलेंटचा वापर करा.
५ बाहेरचे जेवण अथवा रस्त्यावरचे उघडे पदार्थ खावू नका.
६ बाहेर पडताना नाक आणि तोंड झाकून बाहेर पडा.
७ थिएटर, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा.
हे घरगुती उपाय करा
* बटाट्याचे तुकडे व्हिनेगरमध्ये भिजत ठेवा. नंतर ते एका स्वच्छ कपड्यात गुंडाळून डोक्यावर ठेवा.
* लिंबूचे तुकडे कापून तळव्यावर घासा. अथवा हे तुकडे सॉक्समध्ये टाकून झोपा.
* लसूण बारीक करून मधासोबत खा. मोहरीच्या तेलात लसूण तळून घेवून या तेलाने पाय घासा.
* चार ग्लास पाण्यात २० ते २५ तुळशीची पाने, अद्रकचा तुकडा आणि ३-४ लवंग उकळा. प्रत्येक दोन तासात हे पाणी प्या.
* कडूलिंबाची कोवळी पाने चावून खा. लिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करा तसेच खोलीत लिंबाची पाने ठेवा.