आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ अथवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी अनेक विद्वान गुगल सर्च करून डाएट शोधतात. गुगलवर डाएटचे शेकडो प्रकार काही सेकंदात उपलब्ध होतात. परंतु, अशाप्रकारे आपल्या शरीराचा विचार न करता केलेला डाएट धोकादायक ठरू शकतो. मेडिटरेनीयन, अॅटकिन्स, ग्लूटेन फ्री, जनरल मोटर्स, झुकीनी, हुंमुस, ताहिनी सॉस, अशा चित्रविचित्र नावाचे डाएट गुगलवर दिसू शकतात. परंतु, वजन कमी करण्याचे टार्गेट अचिव्ह करण्याच्या नादात चुकीच्या पद्धतीने व्यायाम, डाएट फॉलो केल्यास अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. हे गंभीर परिणाम कोणते आणि कशाप्रकारे काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेवूयात.
चुकीच्या डाएटचे गंभीर परिणाम
१ खूप गळल्यासारखे वाटते.
२ डोळ्याखाली काळे दिसू शकते.
३ ताणतणाव वाढतो.
४ टार्गेट अचिव्ह करण्याच्या हट्टामुळे केस गळू लागतात.
५ चेहऱ्याची आणि शरीराची त्वचा ढीली पडते.
६ कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होतात.
७ थोड्याशा दुखापतीनेसुद्धा फ्रॅक्चर होऊ शकते.
८ चक्कर, भोवळ येणे, असे प्रकार होतात.
हे लक्षात ठेवा
* वजन जसे पटकन कमी होते, तसेच पटकन वाढते.
* कमी केलेले वजन टिकवून ठेवणे कठीण असते.
* डाएट चालू करण्याआधी काही deficiencies नसल्याचे जाणून घ्या.
* झेपतील अशी टार्गेट्स ठेवा.
* वजन कमी करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्या. त्रास होत असेल तर थांबा.
Visit : arogyanama.com