आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स विकत घेत असतो पण, त्याचे फारसे चांगले परिणाम दिसून येत नाहीत आणि त्यात भरीस भर म्हणजे त्या ब्युटी क्रीम्सचे साईड इफेक्टसही भरपूर असतात. त्यामुळे त्वचा आणखी खराब होऊ शकते. म्हणून नैसर्गिकरित्या विविध गुणधर्मयुक्त असलेले नैसर्गिक उत्पादने वापरल्याने तुम्ही सुंदरही दिसतात तसेच तुमचा खर्चही वाचतो म्हणून ही फेसिअल जेल घरच्या घरी बनवून सुंदर दिसा.
१) एलोवेरा फेसिअल जेल : एलोवेरा जेलमध्ये अँटी इंफ्लेमेट्री आणि अँटी बॅक्टरील गुण असल्यामुळे ते त्वचेला अजून सुंदर बनवते एलोवेरा जेल हे त्वचेसाठी एकप्रकारे वरदानच आहे. याने चेहऱ्यावरचे पिंपल्स दूर होतात. एक कोरफडीचा गर व्हिटॅमिन इ तेल, व्हिटॅमिन सी पाऊडर, ग्रेप्स एक्सट्रॅक्टस मिक्स करून फ्रीझ मध्ये ठेवावे व ५ मिनिटांनी ते चेहऱ्यावर लावावे.
२) इसेंसिअल ऑइल फेस जेल : हे ऑईल चेहऱ्याची आर्दता टिकवून ठेवते. याने त्वचा तजेलदार राहते. यात लॅव्हेंडर इसेंसिअल ऑइल आणि सिनेमन इसेंसिअल ऑइल मध्ये ४ चमचे कोरफडीचा गर घालून मिक्स करावे व ते तेल चेहर्यावर लावावे.
३) झेंडूच्या फुलाचे जेल : झेंडूचे फुल हे त्वचेसाठी लाभकारी हर्ब असते. यामध्ये अँटी इंफ्लेमेट्री अँड अँटी बॅटेरिअल गुण असतात जे काळपटपणा दूर करते व चेहऱ्याचा रंग उजाळते. हे तेल बनवण्यासाठी ८ झेंडूची फुले, २० लव्हेंडरची फुले, २०० मी.ली.पाणी, एक कप जिलेटीन, १० गुलाबाची फुले आणि लव्हेंडर इसेंसिअल ऑइल घ्यावे हे सर्व मिक्स करून ग्राइंड करावे. नंतर चेहऱ्यावर लावावे.
४) पुदिन्याच्या पानाचे जेल : पुदिन्यामध्ये मिंथॉल असल्याने ते चेहऱ्यास कुलिंग इफेक्ट देते. त्यामुळे चेहऱ्याची जळजळ होत नाही. तसेच चेहरा नेहमी ताजेतवाना दिसतो. पुदिन्याच्या पानाचं जेल बनवण्यासाठी त्यात लिंबूचा रस, कोरफडीचा गर मिक्स करणे नंतर चेहऱ्यावर लावणे.