आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे आणि प्रदूषणामुळे चेहर्याचा रंग खराब होऊ लागतो. यामुळे त्वचेशी संबंधित इतर समस्यांनाही तोंड द्यावे लागते. चेहरा वयाआधीच निस्तेज, कोरडा आणि वृद्ध दिसू लागतो. वेळोवेळी चेहर्याला फेशियल आवश्यक असते. पण, पार्लरमध्ये खूप खर्च होतो. आपण घरी चारकोल पावडरमध्ये नैसर्गिक गोष्टी मिसळल्यास फायदा होईल. जाणून घ्या..
कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टीचे करा नियमित सेवन, जाणून घ्या
१) चेहरा साफ करणे
फेशियलसाठी प्रथम चेहरा साफ करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्वचेचे छिद्र उघडण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि त्वचेच्या मृत पेशी दुरुस्त करण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात १ चमचा कोरफड जेल आणि १ चमचा चारकोल पावडर टाकून घ्या.आवश्यकतेनुसार पाणी घाला. नंतर हलक्या हातांनी मालिश करा आणि चेहरा आणि मानेवर लावा. ७-८ मिनिटे मालिश केल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
२) मॉइस्चरायझिंग
त्वचेला मॉइश्चराइझ करणे आवश्यक आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारित होऊन त्वचेमध्ये जास्त काळ आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते. कोरड्या त्वचेची समस्या कमी होते. मॉइश्चरायझिंग बनवण्यासाठी एका भांड्यात १ चमचा चारकोल पावडर आणि १ चमचा क्रीम मिसळा. जर तुमची त्वचा आधीच तेलकट असेल तर त्यात १/२ लिंबाचा रस घाला. यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर आणि मानेची मालिश करा. नंतर ओल्या कपड्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल आणि चेहरा स्वच्छ आणि मऊ दिसेल.
ओबेसिटी आणि डायबिटीजसह गोड पदार्थांचे सेवन खराब करू शकते तुमची ‘इम्यून सिस्टम’ सुद्धा
३) स्क्रबिंग
चेहऱ्यावरील घाण आणि मृत त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग आवश्यक आहे. यासाठी एका भांड्यात १ चमचा मध, १ चमचा साखर आणि चार चमचे चारकोल पावडर टाका. आणि ५-७ मिनिटे चेहरा स्क्रब करा. यामुळे मृत त्वचेच्या पेशी स्वच्छ करुन त्वचेला पोषण मिळेल. डाग, फ्रीकलल्स, ब्लॅक आणि व्हाइट हेड्स दूर होतील आणि चेहरा स्वच्छ, चमकदार, मऊ आणि तरुण दिसेल.
बदलत्या हवामानात इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्यासाठी रोज प्या ‘हे’ स्पेशल ड्रिंक
४) फेस पॅक
फेस पॅक हे फेशियलमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाते. यामुळे त्वचेची खोल दुरुस्ती होते. तसेच त्वचेशी संबंधित समस्या दूर होते. चेहरा स्वच्छ, चमकणारा, तरुण दिसतो. फेसपॅक बनविण्यासाठी, चिकणमातीचा १ छोटा चमचा, कोरफड जेल १ चमचा, चारकोल पावडर १ चमचा आणि एक चमचा पाणी मिसळा. तयार मिश्रण चेहर्यावर आणि मानेवर लावा आणि १० मिनिटे किंवा कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या.
Improve Power : ‘काम’शक्ती म्हणजेच ‘संभोग’शक्ती वाढवतील ‘हे’ 10 फूड, आजच करा ट्राय…
५) टोनिंग
हे त्वचेला ओलावा देते. आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम देते. चेहरा स्वच्छ, तरुण, कोमल दिसतो.आपण हे सहज घरी बनवू शकता. यासाठी आपण गुलाबपाणी वापरू शकता. बॅक्टेरियाविरोधी, अँटी-व्हायरल आणि औषधी गुणधर्म असलेले गुलाब पाणी त्वचेला खोल पोषण देते.
Summer Unhealthy Foods : डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशन, उन्हाळ्यात ‘या’ 10 फुडमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या
न्यूट्रिशनची पावर हाऊस आहे ‘ही’ एक ‘गंमत’, उन्हाळ्यात खाल्ल्याने आरोग्याला होतील 8 फायदे, जाणून घ्या
Body Detoxify : सणासुदीला चवीचे पदार्थ भरपूर खाल्ल्याने बिघडू शकते तब्येत, ‘या’ 8 पद्धतीने डिटॉक्स करा बॉडी
व्हेजिटेरियन लोकांमध्ये होऊ शकते प्रोटीन्सची कमतरता, ‘या’ 6 गोष्टींचे सेवन सुरू करा, जाणून घ्या