आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणामुळे अनेक अजार शरीरात घुसखोरी करतात. सध्या लठ्ठपणाची समस्यामुळे वाढत चालल्याने हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह हे आजारदेखील वाढले आहेत. लठ्ठपणाचे अनेक दुष्परिणाम असून तो कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. विविध देशात वजन कमी करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत, या पद्धतींविषयी आपण जाणून घेवूयात.
चीन
हे लोक फर्मेंटेड चहा पितात. यास प्यूअर टी म्हणतात. यामुळे फॅट कमी होते.
थायलँड
हे लोक आपल्या डाएटमध्ये लाल मिरचीचा उपयोग करतात. यातील कॅप्सिनने मेटाबॉलिजम चांगले होऊन वजन कमी होते.
साउथ आफ्रीका
हे लोक रूइबॉस टी पितात. यामध्ये नॅचरल शुगर असते. यामुळे वारंवार भूक लागत नाही, आणि वजन कमी होते.
स्वीझरलँड
येथील लोक मुसेली खातात. यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही, व वजन कमी होते.
नेदरलँड
हे लोक फिश खातात. यामध्ये आमेगा ३ फॅटी अॅसिड असते. यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते आणि वजन कमी होते.
हंगेरी
येथील लोक अॅपल साइडर व्हिनेगरचा वापर करतात. यामुळे फॅट जलद बर्न होते.