आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आवश्यक असतो. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास मेंदूचे व्हिटॅमिन आणि मिनरल्समुळे पोषण होऊन मेंदुची कार्यक्षमता वाढते. या घरगुती उपायाविषंयी आपण अधिक माहिती घेणार आहोत.
हे उपाय करा
१ एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे मध मिसळून नियमित प्या.
२ रात्री सात ते आठ बदाम भिजत ठेवा. सकाळी त्याची साल काढून पेस्ट बनवा. ही पेस्ट आणि मध ग्लासभर दुधात टाकून प्या.
३ दररोज एक ते दोन आक्रोड आणि किशमिश एकत्र खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
४ नियमित द्राक्षे आणि संत्री खा.
५ नियमित एक चमचा मधामध्ये थोडी दालचिनी पावडर टाकून घ्यावे.
६ एक चमचा धना पावडर दोन चमचा मधात मिसळून हे चाटण नियमित घ्यावे.
७ एक चमचा आवळा रस दोन चमचे मधात मिसळून प्या.
८ अद्रक, जिरे आणि खडीसाखर यांची पावडर नियमित घ्यावी.